आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारे ट्रॉफीत दिल्लीचा दमदार ‘विजय’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम- रजत भाटियाच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने पहिल्यांदा विजय हजारे क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. उन्मुक्त चंदचे (116) झंझावाती शतक व रजत भाटिया (3/36), वरुण सूद (2/46) परविंदर अवाना (2/31) यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने रविवारी फायनलमध्ये आसामचा 75 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 9 गडी गमावून आसामसमोर 291 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आसामने 44.2 षटकात अवघ्या 215 धावांवर गाशा गुंडाळला.
धावांचा पाठलाग करणार्‍या आसामकडून धीरज जाधवने सर्वाधिक 87 धावा काढल्या. कर्णधार अहमद (29), प्रीतम दास (31), सय्यद मोहंमद (21) यांनी चांगली खेळी केली. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. गोलंदाजीत दिल्लीकडून रजत भाटियाने तीन परविंदर अवाना व वरुण सूदने प्रत्येकी दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक - दिल्ली- 9 बाद 290 धावा, वि.वि. आसाम- सर्वबाद 215 धावा