आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Kumar, Yogeshwar Datts Khel Ratna And Yuvraj Singh For Arjun Awards

विजयकुमार, योगेश्वरला खेळरत्न तर युवराजला अर्जुन पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंडन ओलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवूण देणारे विजय कुमार आणि योगेश्वर दत्त या दोघांना सर्वोच्च समजला जाणारा क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेळरत्न तर विश्वचषकात 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' आणि कर्करोगावर मात करून टीम इंडियात पुनरागमन करणारा फलंदाज युवराज सिंग याला अर्जुन पुरस्काराने सन्मानीत करण्‍यात येणार आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमारने पिस्तुल शुटींग प्रकारात रौप्य पदक पटकावले होते. तर योगेश्वर दत्त याने कुस्तीत कांस्य पदक मिळवले होते. खेळरत्न पुरस्कारासाठी यापूर्वी या दोघांची शिफारस करण्यात आलेली नव्हती. परंतु लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे क्रीडा मंत्रालयाने या दोघांची नावे निवड समितीकडे पाठवली होती.
क्रीडा दिवसानिमित्त 29 ऑगस्टला राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते विजय आणि योगेश्वर दत्त तसेच युवराज सिंगला सन्मानीत करण्यात येणार आहे. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता राज्यवर्धन सिंग राठोडच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय निवड समितीने खेळरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली आहे.
'क्रिकेट कायमचे सोडणार होता युवी'
ऑलिम्पिक विजेता विजय कुमारला लष्कराकडून बढती!
मॉडेलसोबत छापला युवीचा फोटो... भडकला युवराज