आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय झोलच्या शतकाने महाराष्ट्र विजयी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजय झोलच्या (109) शतकाच्या बळावर महाराष्ट्राने मुंबईवर 17 धावांनी मात केली. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 215 धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा डाव अवघ्या 198 धावांत आटोपला.

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 20 षटकांत 4 बाद 215 धावा काढल्या. यात विजय झोल आणि केदार जाधव या जोडीने 8.2 षटकांत 101 धावांनी अभेद्य भागीदारी रचली. यात विजय झोलने तुफानी फटकेबाजी करत 63 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 5 षटकार खेचत 109 धावांची खेळी केली. केदार जाधवने 22 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा ठोकल्या.

प्रत्युत्तरात मुंबईकडून सलामीवीर एस. शेखने 41, तर आदित्य तारेने 38 धावांचे योगदान दिले. एस. चिटणीसनेही 41 धावा काढल्या. इतर खेळाडूंनी निराशा केली. महाराष्ट्र संघाकडून राकेश त्रिपाठीने 27 धावांत 5 गडी बाद केले. एस. गायकवाडने दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.