आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vijay Zol, Abhimanyu Lamba Batting Defeated Srilanka

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय झोल, अभिमन्यू लांबाच्या धारदार गोलंदाजींपुढे श्रीलंकेची शरणागती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरनेगला (श्रीलंका) - कर्णधार विजय झोलचे (67) अर्धशतक आणि अभिमन्यू लांबाच्या (35/3) धारदार गोलंदाजीच्या बळावर 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाने दुस-या वनडेत श्रीलंकेवर 22 धावांनी विजय मिळवला. भारताने सर्वबाद 240 धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 218 धावांत संपुष्टात आला. भारताने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. मालिकेतील अखेरचा तिसरा सामना गुरुवारी आठ ऑगस्ट होईल.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 48.4 षटकांत सर्वबाद 240 धावा काढल्या. सलामीवीर अंकुश बिन्स (38) आणि अखिल हेरवाडकरने (33) या जोडीने 70 धावांची सलामी दिली. बिन्सने 45 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार लगावला. हेरवाडकरने 49 चेंडूत 4 चौकार मारले. त्यांनतर आलेल्या विजय झोलने अर्धशतक ठोकले. संजू सॅमसन (3) व सरफराज खान (13) हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेल्या रिकी भुईने 24 आणि तळातील फलंदाज आमीर गानीने 25 धावांची उपयुक्त खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 218 धावात आटोपला. मधल्या फळीतील तिलकशा सुमनासिरीने लंकेकडून सर्वाधिक नाबाद 73 धावा काढल्या. त्याने 82 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार खेचले.


संक्षिप्त धावफलक : भारत 48.4 षटकांत सर्वबाद 240 धावा, बिन्स 38, हेरवाडकर 33, विजय झोल 67, कारुनारातने 44/4. श्रीलंका 47 षटकांत सर्वबाद 218 धावा. तिलकशा सुमनासिरी नाबाद 75, प्रियामल परेरा 47, अभिमन्यू लांबा 35/3.


विजय झोलचे मालिकेत दुसरे अर्धशतक
कसोटीत शानदार कामगिरी केल्यानंतर कर्णधार विजय झोलने (67) वनडेतही आपला फॉर्म कायम ठेवत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतक काढले होते. यावेळी त्याने 57 चेंडूचा सामना करताना 6 चौकार व 1 षटकार खेचत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याला अरुद्धाने बाद केले.


विजयने पुन्हा सिद्ध केले
विजय झोलने स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तो कसोटीप्रमाणे वनडेतही चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्या कामगिरीमुळे आणि भारताच्या विजयामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हरिभाऊ झोल, विजयचे वडील.


मालिका विजयाचे लक्ष्य ठरवले
दौ-यावर संघ चांगली कामगिरी करत आहे. आजच्या विजयाने आत्मविश्वास वाढला. गुरुवारी होणार अखेरचा सामना जिंकून कसोटी प्रमाणे वनडे मालिका जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे.
विजय झोल, कर्णधार, भारतीय ज्युनियर क्रिकेट संघ