आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय झोलच्या शतकाने भारताची श्रीलंकेवर आघाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरनेगला (श्रीलंका) - कर्णधार विजय झोलच्या (128) शतकाच्या बळावर भारताने 19 वर्षांखालील चारदिवसीय दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात दुसर्‍या दिवशी श्रीलंकेवर 181 धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने दिवसअखेर दुसर्‍या डावात बिनबाद 11 धावा केल्या.

कालच्या 2 बाद 70 धावांच्या पुढे खेळताना भारताने दुसर्‍या दिवशी 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला. विजय झोलने शानदार शतकी खेळी केली. त्याला फर्नांडोने डुमिनादूकरवी झेलबाद केले. संजू सॅमसनने (70) अर्धशतक ठोकले. त्याने 122 चेंडूंत 10 चौकार लगावले. सॅमसनला लाक्षणने कुलशेखराच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. झोल आणि सॅमसनने 160 धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर आलेल्या अय्यरने 126 चेंडूचा सामना करताना 11 चौकारांच्या मदतीने 84 धावा काढल्या. त्याला परेराच्या गोलंदाजीवर मेंडिसने झेल बाद केले. बिन्स मोठी खेळी करू शकली नाही. तो सात धावा करून बाद झाला. तळातील फलंदाज कुलदीप यादवने 59 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार लगावत 41 धावांची उपयुक्त खेळी केली. मेंडिसच्या अचूक थ्रोवर तो धावबाद झाला. श्रीलंकेने दुसर्‍या डावात दिवसअखेर बिनबाद 11 धावा केल्या. सलामीवीर दुमीनादू नाबाद 6 आणि एम. भानुका नाबाद 5 धावांवर खेळत आहेत. श्रीलंका आणखी 170 धावा मागे आहे. त्यांच्या हातात 10 विकेट शिल्लक आहेत.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : पहिला डाव- सर्वबाद 212,
दुसरा डाव दिवसअखेर 11/00
भारत : पहिला डाव - सर्वबाद 393. (विजय झोल 128, संजू सॅमसन 70, एस.अय्यर 84, पी. परेरा 24/2.)
विजयचे सलग दुसरे शतक

भारताचा युवा स्टार फलंदाज विजय झोलने मालिकेत सलग दुसरे शतक ठोकले. त्याने पहिल्या सामन्यात 173 धावांची खेळी केली होती. दुसर्‍या सामन्यात विजयने 128 धावा काढल्या. त्याने 204 चेंडूंचा सामना करताना 16 चौकारांसह 1 षटकार लगावला.


उत्कृष्ट शतक
विजयचे शतक म्हणजे दबावातील सवरेत्कृष्ट खेळी आहे. कसोटी कामगिरीत सातत्य राखले. हे त्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. तो अशाच प्रकारचे वनडेतही प्रदर्शन करून भारताला चॅम्पियनशिप जिंकून देईल, असा विश्वास आहे. राजू काणे, विजयचे प्रशिक्षक