आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार विजय झोलवर एका सामन्याची बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार विजय झोलवर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा लावण्यात आली आहे. आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात आयसीसीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विजय झोलला दोषी ठरवण्यात आले. यानंतर ही बंदीची शिक्षा जाहीर करण्यात आली. या वेळी ऑफस्पिनर आमिर गनीला फटकारण्यात आले. खेळाडू आणि खेळाडूंच्या सहकारी व्यक्तीसाठी आचारसंहिता 2.2.8 कलमानुसार विजय झोल दोषी आढळला. हे कलम इतर खेळाडू, सहकारी खेळाडू, पंच, सामनाधिकारी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान गंभीररीत्या अश्लील, आक्रमक व अवमानकारक भाषा वापरणे किंवा तसे संकेत करण्याशी संबंधित आहे. आचारसंहिता 2.1.4 नुसार गनी दोषी आढळला. या बंदीमुळे झोल आता सोमवारी श्रीलंकेविरुद्ध सामन्यात खेळू शकणार नाही.