आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंड दौरा : विजय झोल भारतीय ‘अ’ संघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - न्यूझीलंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय अ संघात जालन्याचा विजय झोलची निवड झाली. यात एकदिवसीय, तीनदिवसीय व चार दिवसांचे कसोटी सामने खेळण्यासाठी संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहे. या दोन स्वतंत्र संघांची निवड राष्ट्रीय समितीने मुंबईत केली. तीन व चार दिवसांच्या सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या ‘अ’ संघाचे नेतृत्व अभिषेक नायरकडे सोपवण्यात आले. या निवडीबद्दल जालन्यात चाहत्यांनी आनंद साजरा केला.

भारतीय अ संघ : अभिषेक नायर (कर्णधार), जीवज्योतसिंग, उन्मुक्त चंद, विजय झोल, मनप्रीत जुनेजा, जगदीश, सी. गौतम, धवल कुलकर्णी, अनिकेत चौधरी, र्शीकांत वाघ, सक्सेना, राकेश ध्रुव, सरबजित लढ्ढा.

एकदिवसीय सामन्यात खेळणारा ‘अ’ संघ : उन्मुक्त चंद (कर्णधार), रॉबीन उथप्पा, आदित्य तरे, केदार जाधव (महाराष्ट्र), मनदीपसिंग, अशोक मिनादिया, संजू विश्वनाथ, सचिन बेबी, धवल कुलकर्णी, वसंत मोहंती, संदीप शर्मा, र्शीकांत वाघ, राहुल शर्मा, जलाज सक्सेना.