आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय झोल, मोहसीन सय्यद यांची आशिया चषकासाठी निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - मराठवाड्याचे गुणवंत खेळाडू विजय झोल आणि मोहसीन सय्यद यांची आशिया चषकासाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी संघाची घोषणा केली.
युवा स्टार खेळाडू उन्मुक्त चांदची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जालन्याचा विजय झोल दमदार आक्रमक फलंदाज असून लातूरचा मोहसीन सय्यद वेगवान गोलंदाज आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या पाचव्या सत्रासाठी विजय झोलसोबत बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने करार केला होता. 19 वर्षांखालील खेळाडूंची आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 23 जून ते 2 जुलैदरम्यान क्वालालंपूर येथे होणार आहे.
भारतीय संघ : उन्मुक्त चांद (कर्णधार), अक्षदीप नाथ (उपकर्णधार), मनन वोहरा, अखिल हिरवाडकर, अपराजित बाबा, विजय झोल, संदिपान दास, विकास मिश्रा, संदीप शर्मा, रुष कलारिया, मोहसीन सय्यद, समीत पटेल, हरमितसिंग, कमल पस्सी, संजू विश्वनाथ.

संधीचे सोने करणार
आशिया चषकासाठी मला संधी मिळाली आहे. भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी मेहनत घेणार आहे. आमची टीम चांगली बॅलन्स आहे. मागच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात खेळण्याचा अनुभवही मला कामी येईल. आयपीएलमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या सल्ल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. आता केवळ चांगली कामगिरी करण्याकडे माझे लक्ष आहे.
- विजय झोल, फलंदाज.

मराठवाड्याचे नाव रोशन होणार

विजय झोल आणि मोहसीन सय्यद हे दोघेही गुणी खेळाडू आहेत. या दोघांनीही मिळालेल्या संधीचे सोने करावे. त्यांनी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी केली तर अटकेपार मराठवाड्याचे नाव रोशन होईल याचा मला विश्वास आहे.
प्रदीप देशमुख, विभागीय प्रमुख, एमसीए.