आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Zol Scores Century Against Sri Lanka In U19 Test Match

झोलचे नाबाद शतक; भारताची श्रीलंकेविरुद्ध दमदार सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाम्बुला- जालन्याचा गुणवंत खेळाडू व भारतीय युवा संघाचा कर्णधार विजय झोलने श्रीलंकेविरुद्ध 19 वर्षांखालील चारदिवसीय कसोटीत नाबाद 129 धावांची खेळी केली. या शानदार शतकाच्या बळावर भारताने पहिल्या दिवसअखेर मंगळवारी 2 बाद 333 धावा काढल्या. भारताकडून विजय झोल व संजू सॅमसन या दोघांनी तिस-या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. श्रीलंकेकडून जयसिंगे व रमेश मेंडिसने प्रत्येकी एक गडी बाद केला.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या युवा संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय युवा संघाला सलामीवीर शुभम खजुरिया (52) व अखिल हेरवाडकर (71) यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी केली. दरम्यान, जयसिंगेने ही जोडी फोडली. त्याने खजुरियाला झेलबाद केले. भारताच्या खजुरियाने 62 चेंडूंत 10 चौकारांसह 52 धावांचे योगदान दिले.

झोलने अखिल हेरवाडकरसोबत दुस-या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. रमेश मेंडिसने हेरवाडकरला बाद केले. हेरवाडकरने 125 चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार ठोकून 71 धावा काढल्या.