आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजय झोलच्या युवा क्रिकेट संघाने श्रीलंकेचा केला पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दांबुला - जालन्याचा गुणवंत खेळाडू विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध 19 वर्षांखालील वनडे मालिका जिंकली. यंग इंडियाने तिस-या व शेवटच्या वनडेत श्रीलंकेवर 7 गड्यांनी मालिका विजय मिळवला. भारताने सलग दुसरा वनडे जिंकून मालिका 2-0 ने खिशात घातली. पावसाच्या व्यत्ययामुळे मालिकेतील पहिला सामना पूर्ण होऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना यजमान श्रीलंकेने 391. षटकांत 137 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 32.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.


धावांचा पाठलाग करणा-या भारताकडून शुभम खजुरिया (34) व हेरवाडकर (25) या जोडीने पहिल्या गड्यासाठी 39 धावांची भागीदारी केली. हेरवाडकरने 29 चेंडूंत चार चौकारांसह 25 धावा काढल्या. तिस-या क्रमांकावर आलेल्या विजय झोलने खजुरियासोबत दुस-या गड्यासाठी 35 धावांची भागीदारी केली. परेराने खजुरियाला झेलबाद केले. झोलने 38 चेंडूंत दोन चौकारांसह 23 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसन (31) व मो. सैफ (22) यांनी संघाला विजय मिळवून दिला.


तत्पूर्वी यजमान श्रीलंका संघाकडून परेराने सामन्यात सर्वाधिक 50 धावा काढल्या. भानुका (42) व रिदमा (32) वगळता इतर सात फलंदाज एकेरी धावा काढून
तंबूत परतले.


भारताचे स्पर्धेतील यश
पहिला सामना (अपूर्ण राहिला )
दुसरा सामना 22 धावांनी विजयी
तिसरा सामना 7 गड्यांनी विजयी


सरफजराज खानची धारदार गोलंदाजी
भारताकडून तिस-या वनडेत मुंबईच्या 15 वर्षीय सरफराज खानने धारदार गोलंदाजी केली. त्याने 7.1 षटकांत 27 धावा देऊन चार विकेट घेतल्या. तसेच कुलदीपने सात षटकांत 16 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने सलामीवीर भानुका (42), रमेश मेंडिस (5) व नानयक्काराला (9) बाद केले.


संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : सर्वबाद 137 पराभूत वि. भारत : 3 बाद 141 (खजुरिया 34, हेरवाडकर 25, झोल 23, सॅमसन नाबाद 31, सैफ नाबाद 22)