आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंगच्या बॉक्सिंग करिअरला ग्रहण लागले आहे. ड्रग्ज स्कँडल प्रकरणात नाव समोर आल्याने त्याला जूनमध्ये क्युबा व सायप्रस येथे होणार्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून बाहेर करण्यात आले.
पतियाळा येथील प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहिल्यानंतर 27 वर्षीय विजेंदरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संघात निवड करण्यात आली नाही. ऑक्टोबरमध्ये कझाकस्तानात वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे. या चॅम्पियनशिपसाठी क्युबा व सायप्रसमधील स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. पंजाब पोलिसांनी हेरॉइन घेतल्याचा आरोप विजेंदरवर लावला. यानंतर बीजिंग ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सरच्या अडचणी कमी होण्याचे नावच घेत नाहीत. भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनने (आयएबीएफ) दिलेल्या माहितीनुसार, विजेंदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला नव्हता. या अनुपस्थितीमुळे तो दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊ शकत नाही.
‘विजेंदर संघातून बाहेर नाही. मात्र, तो क्युबा व सायप्रसमध्ये होणार्या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. विजेंदर ऑलिम्पिकचा हीरो आहे. ड्रग्जप्रकरणी अडचणीत सापडल्याने तो शिबिरात सहभागी झाला नाही. तो सध्या फार दडपणाखाली आहे. आठवडाभरात त्याला क्लीन चिट मिळण्याची आशा आहे. यानंतर तो पुनरागमन करू शकतो, ’ अशी प्रतिक्रिया आयएबीएफचे अभिषेक मटोरिया यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.