आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रांत तांदळे उपांत्य फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुणे येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया रॅकिंग टेनिस चॅम्पियनशिप सिरीजमध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या गटात औरंगाबादच्या विक्रांत तांदळेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपांत्यपूर्व लढतीत प्रथम मानांकित मुंबईच्या अरमान भाटियाचा 9-7 गुणांनी पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले. रोमांचक झालेल्या लढतीत विक्रांतने 2 तास 10 मिनिटांत हा विजय मिळवला. तत्पूर्वी त्याने पुण्याच्या प्रजित ओस्तवाला 8-2 गुणांनी धूळ चारली. बुधवारी पीयूष सालेकर वि.सिद्धार्थ कोल्होकर यांच्या लढतीत विजेत्यासोबत विक्रांतची उपांत्य फेरीत गाठ पडेल. विक्रांत मराठवाडा टेनिस प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू असून त्याला प्रशिक्षक प्रवीण गायसमुद्रे, गजानन भोसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.