आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डनमधून व्हीनसची माघार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पाच वेळेसची विम्बल्डन चॅम्पियन आणि माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सने पाठीच्या दुखापतीमुळे पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपनमध्ये व्हीनसला पहिल्या फेरीत पोलंडच्या उर्सजुला रंदावांस्काकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या 12 महिन्यांत व्हीनस प्रथमच एखाद्या स्पर्धेतून पहिल्याच फेरीत बाद झाली होती.


व्हीनसने आपल्या फेसबुक पेजवर याबाबत माहिती दिली. ‘दुर्दैवाने मी यावर्षी विम्बल्डनमध्ये खेळू शकणार नाही. यामुळे मी दु:खी आहे. या स्पर्धेत खेळणे मला सुरुवातीपासून आवडते. मात्र, पाठीच्या दुखापतीतून सावरण्यास मला वेळ लागणार आहे. मी माझ्या चाहत्यांची माफी मागते,’ असे तिने म्हटले.