आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या नारीशक्तीला सलाम; बुडती नाैका सावरली !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या कमाईच्या बाबतीत निराशेचे ढग दाटून आले असताना भारताच्या नारीशक्तीने आशेचे किरण दाखवले. साक्षी मलिकच्या कांस्य पदकामुळे भारताचा तिरंगा रिओमध्ये प्रथमच फडकला. साऱ्या आशा-अपेक्षांना धक्के देत पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आणि पुन्हा एकदा भारतीय महिलांनीच भारताची डुबती नौका सावरली, असे चित्र रिओमध्ये दिसायला लागले.

पहिले पदक मिळाल्याचा आनंद रिओमधील प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरून ओसंडून जात होता. ते पाहून अनेक परदेशी पत्रकारांना आणि ब्राझीलवासीयांना वाटले, भारताने बहुधा पदकांचा मोठा टप्पा गाठला असावा. भारताची तीच नारीशक्ती आज आणखी एका मोठ्या पदकाच्या नजीक आली. मुलगी जन्माआधीच नको असलेल्या देशाच्या काही दुर्गम भागातून आलेल्या महिलांनी हे पराक्रम केले आहेत.

साक्षीच्या राज्यात, जिल्ह्यात आणि गावात हीच मानसिकता बदलायला खूप काळ लागला. १० पैकी ८ पुरुष असे व्यस्त प्रमाण असलेल्या पुरुषी वर्चस्वाच्या समाजात साक्षी वाढली. कुस्ती खेळायला घरातून प्रचंड विरोध होता. कारण मुली फारशा कुस्ती खेळायच्या नाहीत. जेथे आपला चेहरा दाखविणे हाच अपराध वाटतो, अशा समाजात मोठी झालेली साक्षी घरातल्यांचाही विरोध सहन करून आपला खेळ जोपासायची. आधुनिकता, मुक्त समाज वगैरे गोष्टी तिने केवळ स्वप्नातच पाहिल्या. मात्र फोगाट भगिनींचा कुस्तीतला सहभाग वाढला आणि साक्षीच्याही घरातला विरोध हळूहळू कमी कमी झाला. रोहटकच्या ईश्वर दहिया आखाड्यात जेव्हा तिने प्रवेश घेतला, तेव्हा साक्षीच्या समाजातील लोकांनी मोठा गहजब केला. कारण तो आखाडा पुरुषांसाठी होता. पण साक्षीचे कुटुंबीय तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्याच वेळी सुमन कुंडू या महिला कुस्तीगीरने सब ज्युनियर नॅशनलमध्ये सुवर्णपदक पटकावले व विरोध मावळला. त्यानंतर साक्षीची सायकलवरून आखाड्यापर्यंतची परेड राजरोसपणे सुरू झाली.

सायकलवरचा हा प्रवास सायना नेहवालनेही केला. शालेय जीवनात अभ्यास व बालपण पणास लावलेल्या सानियाच्या यशानंतर अनेकांनी आपल्या मुलींना खेळात पाठविण्यास अनुकूलता दर्शविली. सायनाच्या पाठी तिचे स्वत: खेळाडू असलेले पालक खंबीरपणे उभे होते, म्हणून आजवरचा प्रवास अडथळ्यांचा झाला नाही. सानिया मिर्झालाही समाजातून मोठा विरोध झाला. तिचे पालक सावलीसारखे तिच्यासोबत आजपर्यंत राहिले. त्यामुळेच आप्तस्वकियांच्या विरोधानंतरही ती यश गाठू शकली.

पी. व्ही. सिंधूच्या सुदैवाने तिचे वडील रामण्णा भारताचे माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू होते. आई पी. विजया हीदेखील व्हॉलीबॉल खेळाडू होती. आई-वडिलांकडून शारीरिक उंचीची निसर्गदत्त देणगीच तिला मिळाली होती. घरात खेळाचे वातावरण होते. मात्र गुंटूर (आंध्र प्रदेश) येथील या मुलीने आई-वडिलांच्या व्हॉलीबॉल खेळाची नव्हे तर बॅडमिंटन या खेळाची निवड केली. वयाच्या ८ व्या वर्षापासून ती बॅडमिंटन कोर्टवर जायला लागली. जेव्हा पुलेला गोपीचंदच्या अकॅडमीत प्रवेश घेतला तेव्हा दररोज ३० किलोमीटर्सची पायपीट करून ती सरावाला यायची. तिच्याकडे गुणवत्ता होती परंतु सातत्य नव्हते. त्यामुळे थेट भारताच्या संघात येण्यासाठी तिला बरेच कष्ट करावे लागले. बॅडमिंटन संघटकांनी तिला अनुभवासाठी मुख्य स्पर्धेऐवजी अन्य स्पर्धांना पाठवायला सुरुवात केली. गुणवत्ता प्रचंड असल्यामुळे तिने जागतिक क्रमवारीतील अनेक मोठ्या खेळाडूंना हरविले.
बातम्या आणखी आहेत...