आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Dalvi\'s Artical On Mother Of Sachin Tendulkar

सचिन कधी क्रिकेट सोडेल असे वाटलेच नव्हते... आईच्या मनातला सचिन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आई नावाची देवालाही वाटते नवलाई...म्हणे पंढरीचा विठोबा स्वत:ला विठाई...’ भारतीय क्रिकेट पंढरीचा देव अर्थात सचिन रमेश तेंडुलकर निवृत्त होत आहे. क्रिकेटच्या दुनियेवर गेली 24 वर्षे ज्याने अधिराज्य गाजवले, तो सचिन घडला कसा, त्या सचिनचे वेगळेपण काय होते.. याबाबत त्याची आई रजनी तेंडुलकर यांनी ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी व्यक्त केलेले मनोगत त्यांच्याच शब्दांत...!
सचिन निवृत्त होईल ही कल्पनाच कधी केली नव्हती. क्रिकेट पाहण्याची एक ओढ तो खेळत असताना नेहमी असायची. यापुढे तेवढी उत्सुकता राहील किंवा नाही हे सांगणे कठीण आहे.सचिन कीर्तीच्या शिखरावर पोहोचला तरीही आई म्हणून कायम माझ्यापुढे नतमस्तक होऊनच राहिला. त्याचे क्रिकेटचे आधीचे आणि नंतरचे नातेही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तसेच कायम आहे. त्याच्या वागणुकीत मुळीच बदल झाला नाही. खेळात खूप मोठा झाला, मात्र माणूस म्हणून तो आजही पूर्वीसारखाच शालीन, शांत असल्याचे मी पाहते.
सचिनला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत ही भावनाच मनाला खूप खूप समाधान देते. ती भावना अखेरपर्यंत टिकून राहावी, हीच माझी इच्छा आहे.कीर्तीच्या शिखरावर असतानाही विनम्र राहण्याचे संस्कार त्याला तेंडुलकर कुटुंबाकडून मिळाले. संस्कार हे मुलांना बसवून वेगळे करावे लागत नाहीत, तर ते उपजतच असावे लागतात. घरातले चांगले संस्कार प्रत्येक जण आपोआपच स्वीकारत असतो. सचिननेही संस्कार घरातलेच आत्मसात केले आहेत.
सचिन घरी आला की फक्त घरातलेच जेवतो. माझ्या हातचा वरण-भात व अळूची भाजी त्याला खूप आवडते. तो मला अनेक पदार्थ बनवण्यास सांगत असतो. मीसुद्धा त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याला खाऊ घालते. घरी नसताना तो क्रिकेट खेळत असला तरीही त्याचे सतत घराकडे लक्ष असते. फोन करून घरच्यांशी संवाद कायम साधत असतो. घराच्या संपर्कात राहणे, घरच्यांशी बोलणे त्याला आवडते. मी त्याला टी.व्ही.वर खेळताना पाहिले आहे. तो शतकाच्या जवळ आला की (90 नंतर) मी डोळे बंद करून घेते, सामना पाहत नाही. नंतर आरडाओरड ऐकू आली की कळतं, आता शतक झाले! आता डोळे उघडून क्रिकेट पाहायला हरकत नाही, असे मला वाटते.