आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Kambli And Andrea Hewitt Opts For Catholic Wedding

विनोद कांबळीचे पुन्हा एकदा स्वयंवर; पाहा कांबळीची स्टाइलिश वाइफ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा विवाहबद्ध झाला. विनोदने पत्नी अँड्रिया हेवित हिच्यासोबत यापूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. आता विनोद तिच्यासोबत पारंपारिक पद्धतीने विवाह केला आहे. विनोदने वांद्रे येथील पीटर्स चर्चमध्ये कॅथलिक पद्धतीने विवाह केला आहे. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातील सर्व परंपराही त्याने निभावल्या. गेल्या शनिवारी (3 मे) झालेल्या विवाहसोहळ्यात त्याचा मुलगा बेटा जीसस क्रिस्टियानो हा उपस्थित होता.

पारंपारिक पद्धतीन विवाह करण्याचे अतिशय घाईगडबडी ठरले. त्यामुळे पार्टीचे नियोजन करता न आल्याचे विनोद कांबळी म्हणाला. विनोद आणि अँड्रिया चे मोचकेच मित्र यावेळी उपस्थित होते. त्यात अभिनेता आशुतोष राणा आणि रेणुका यांचा समावेश होता.

विनोद आता खूप आध्यात्मिक झाला आहे. आपल्या समाजिक रुढी-परंपरांवर त्याचा विश्वास आहे. नोव्हेंबरमध्ये त्याला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याच्यात हे परिवर्तन झाल्याचे विनोदच्या नातेवाईकांनी सांगितले.

विनोदने क्रिकेटसह राजकारण आणि सिनेमात आपले नशीब आजमावले आहे. त्याची पत्नी अँड्रिया ही देखील त्याच्यासारखी स्टाइलिश आहे. विवाहपूर्वी अँड्रिया मॉडेलिंग करत होती. विनोद आणि अँडियाचा विवाह 2006 मध्ये झाला होता. दरम्यान, अँ‍डिया ही विनोदची दुसरी पत्नी आहे. विनोदची पहिली नोएला ही देखील खूप सुंदर होती. मात्र, वारंवार वाद होत असल्याने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, विनोद कांबळीची स्टाइलिश पत्नी अँड्रियाची झलक...