आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vinod Tawade Congratulate Hindkesari Sunil Salunkhe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात दहा कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार - विनोद तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. भविष्यात महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी निर्माण व्हावेत यासाठी राज्यात दहा ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार असल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे हिंदकेसरी सुनील साळुंखे यांनी मंगळवारी क्रीडामंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. विनोद तावडे यांनी साळुंखे यांचे अभिनंदन केले. भविष्यात कुस्तीचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काय करता येईल, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.

त्या वेळी तावडे म्हणाले की, कुस्तीला नावरूप देणे, तसेच महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी निर्माण व्हावेत यासाठी क्रीडामंत्री म्हणून आपण जातीने लक्ष देणार आहोत. यासाठी दहा ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके कशी जिंकता येतील याबाबतचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
(फोटो : सुनील साळुंखेचा सत्कार करताना क्रीडामंत्री विनोद तावडे.)