आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीने सचिन, गांगुलीला टाकले मागे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तिरंगी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध शानदार ठोकणारा टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीलाही मागे टाकले आहे. कोहलीचे हे 14 वे वनडे शतक होते.


आकडेवारीनुसार सचिन तेंडुलकरने आपले 14 वे शतक 187 व्या सामन्यात झळकावले, तर गांगुलीला 14 व्या शतकासाठी 148 सामने खेळावे लागले. सचिन, गांगुली आणि कोहलीशिवाय वीरेंद्र सेहवाग असा चौथा भारतीय खेळाडू आहे, ज्याच्या नावे वनडेत 14 शतके आहेत. त्याने 234 व्या सामन्यात ही कामगिरी केली. सचिनच्या नावे एकूण 49 शतके तर सौरव गांगुलीची 22 वनडे शतके आहेत. कोहलीने वेगाने शतक ठोकण्याच्या शर्यतीत सचिन, गांगुलीसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.