आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली अव्वल स्थानावर; मालिकेतील कोहलीची कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर करिअरमधील अपूर्व अशी कामगिरी केली आहे. तो आयसीसीच्या वनडे फलंदाजीच्या क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला.

नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहली चमकला. कोहलीने मालिकेतील पाच सामन्यांत उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर एकूण 344 धावा काढल्या. त्याने 114.66 च्या सरासरीने या धावा काढल्या. यामध्ये प्रत्येकी दोन शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा केली. यामध्ये त्याने 38 गुणांची कमाई केली. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलावर कुरघोडी करून अव्वल स्थान गाठले. त्याचे हे करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थान ठरले आहे. अमलाची दुसर्‍या स्थानी घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीनेही सहा स्थानांनी सुधारणा केली. त्याने तिसर्‍या स्थान गाठले.

शिखर धवन टॉप-20 मध्ये
भारताच्या शिखर धवनने वनडेच्या अव्वल 20 मध्ये धडक मारली. यासह त्याने करिअरमधील सर्वोत्कृष्ट स्थान गाठले. धवनने क्रमवारीत 11 वे स्थान गाठले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत एकूण 284 धावा काढल्या. रोहीतने 15 वे स्थान गाठले.

भारताचे अव्वल स्थान कायम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या व निर्णायक वनडेतील शानदार विजयाने भारताने मालिका 3-2 ने खिशात घातली. यासह टीम इंडियाने क्रमवारीतील आपले अव्वल स्थानही कायम ठेवले. दुसर्‍या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया टीमचेही स्थान कायम आहे.

टॉप-5 फलंदाज
1. विराट कोहली
2. हाशिम आमला
3. जॉर्ज बेली
4. कुमार संगकारा
5. एल्बी डिव्हिलर्स

टॉप-5 गोलंदाज
1. सईद अजमल
2. सुनील नरेन
3. रवींद्र जडेजा
4. स्टीव्हन फिन
5. रंगना हेराथ

तिसरा भारतीय फलंदाज
आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा विराट कोहली हा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी या स्थानावर सचिन तेंडुलकर (2008) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (2010) विराजमान झाले होते.

61 धावा (पुणे), 100 नाबाद धावा (जयपूर), 68 धावा (मोहाली), 115 नाबाद (नागपूर), 0 धावा (बंगळुरू)

05 सामने
344 धावा
02 शतके
02 अर्धशतके

पुढील स्लाईड्‍वर क्लिक करून वाचा, 'वॉटसनशी अरेरावी; जडेजाला दंड'