आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: कोहलीच्या 500 धावा पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा कर्णधार व आक्रमक फलंदाज विराट कोहलीने आयपीएल-6 मध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी दिल्लीविरुद्ध 99 धावांच्या खेळीदरम्यान कोहलीने 500 धावा पूर्ण केल्या.त्याच्या नावे आयपीएल-6 मध्ये आता 13 सामन्यांत 42.00 च्या सरासरीने आणि 135.84 च्या स्ट्राइक रेटने 504 धावा झाल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाºया फलंदाजांच्या यादीत तो चेन्नईचा मायकेल हसी (574) व क्रिस गेल (570) यांच्यानंतर तिसºया क्रमांकावर आहे.यामध्ये विराटने आतापर्यंत 90 सामन्यांत 2143 धावा काढल्या आहेत.