आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीचा विश्वविक्रम; लाराशी बरोबरी तर ख्रिस गेलला टाकले मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार आणि बांगलादेशविरूद्ध बुधवारी झालेल्या सामन्याचा शिल्पकार विराट कोहलीने विश्वविक्रम केला आहे. कोहली सगळ्यात कमी एकदिवसीय सामन्यात 19 शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने 124 सामन्यांत 19 शतक ठोकून ख्रिस गेलचा विक्रम कोडीत काढला आहे. याशिवाय कोहलीची लाराशी बरोबरी केली आहे. कोहलीने 48 चेंडूंत 50 धावा आणि नंतर 19 वे शतक ठोकून वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या शतकांची बरोबरी केली.

दरम्यान, वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने 189 एकदिवसीय सामन्यांत 19 शतक पूर्ण केले होते. दरम्यान बुधवारी झालेल्या आशिया चषकातील सामन्यात बांगलादेशविरूद्ध कोहलीने शानदार 136 धावांची कर्णधारी शतकी खेळी केली होती.

सर्वाधिक एकदिवसीय शतक ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आठव्या स्थानी आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर(49), पाकिस्तानचा सईद अनवर(20), वेस्टइंडीजचा ख्रिस गेल (21), दक्षिण आफ्रीकेचा हर्शल गिब्स (21), भारताचा सौरव गांगुली (22), श्रीलंकेचा सनत जयसूर्या (28), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग (30) यांचा समावेश आहे.