आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli At The Launch Of His Fashion Brand WROGN

होय..! जे आहे ते सगळे तुमच्यासमोर आहे, प्रेमवीर विराट कोहलीची जाहीर कबूली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचा स्‍टार क्रिकेटपटू विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत संबंध असल्‍याचे कबूल केले आहे. सोबतच आम्‍हाला खासगी आयुष्‍य जगू द्या असा माध्‍यमांना सूचक इशाराही केला आहे. विराट WRONG या टी-शर्टच्‍या लॉन्चिंगवेळी बोलत होता.
विराट म्‍हणाला की, आमच्‍यामध्‍ये जे काही चाललेले आहे ते सर्वश्रुत आहे. आम्‍ही तुमच्‍यापासून काहीच लपवविलेली नाही. लपवू इच्छितही नाही. परंतु आपण आम्‍हाला वारंवार असेच विचारत राहाल तो चर्चेचा विषय बनतो. ही गोष्‍ट आमच्‍यासाठी अत्‍यंत खासगी आहे. आपण दुस-यांच्‍या खासगी गोष्‍टींचा सन्‍मान केला पाहिजे.
भारतीय संघातील चमकता तारा विराट आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्‍का अनुष्‍कासोबत अफेअर असल्‍याच्‍या माध्‍यमात जोरदार चर्चा आहेत. त्‍यांच्‍या संबधावर बोलताना विराट म्‍हणाला की, जेव्‍हा आम्‍ही दोघे सोबत असतो तेव्‍हाही तुम्‍ही आमच्‍या संबधावर विचारता. किमान आपणास कळायला हवे आमच्‍यात काही संबंध नसते तर, आम्‍ही सोबत असतो का?
पुढील स्‍लाइडवर वाचा, बीसीसीआयच्‍या नियमाचे उल्‍लंघन करुन विराट अनुष्‍कासह ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर...