अॅडिलेड - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये अॅडिलेड येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा फिलिप ह्यूजच्या आकस्मिक मृत्युच्या आठवणी ताज्या झाल्या. इतर वेळी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्यांच्या खास शैलितील बाउंसरने समोरच्या फलंदाजाला घाबरवण्याचे काम करायचे पण एडिलेडच्या मैदानावर आज काहीसे उलटे चित्र पाहण्यास मिळाले.
त्याचे झाले असे की, तिस-या दिवशीचा खेळ सुरू करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार मैदानात उतरल्यावर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सने
विराट कोहलीचे स्वागत बाउंसर टाकून केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाउंसर टाकेपर्यंत जॉन्सनचा वागणे आक्रामक कांगारू क्रिकेटपटू सारखे होते पण, चेंडू टाकल्यानंतर तो ज्यावेळी समोर उभ्या असलेल्या विराटच्या डोक्याला लागला त्याच क्षणी जॉन्सनच्या पायाखालची जमीन सरकली.
विराटला चेंडू लागताच मिचेल जॉन्सनसहित मैदानावरील प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूने विराटकडे धाव घेतली आणि त्याची चौकशी केली. असे करण्यामागे त्यांचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे फिलिप ह्युग्जचा मृत्यु. मागच्या 27 नोव्हेंबर रोजी असाच एक बाउंसर डोक्याला लागल्यामुळे फिलिपचा मैदानात मृत्यु झाला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चांगलाच धसका घेतला आहे. हे आजच्या घटनेवरून स्पष्ट होते.
अंपायरदेखील घाबरले
ज्यावेळी चेंडू विराट कोहलीच्या हेलमेटच्या समोरच्या बाजूला लागला त्यावेळी विराट काही काळासाठी घाबरला होता. हे पाहून मैदानात उपस्थित प्रत्येक खेळाडूच्या पाया खालची जमीन सरकली. तर, समोर उभे असलेले अंपायर देखील घाबरले. विराटला काही गंभीर दुखापत झाली नसल्याची खात्री करून पचांनी सामना पुन्हा सुरू करण्यास सांगितले. दरम्यान चेंडू लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार माइकल क्लार्कने गोलंदाज जॉन्सन आणि कोहलीच्या पाठीवर हात ठेवत त्यांना धीर दिला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रांमधून पाहा, विराट कोहलीला बाउंसर लगल्यानंतर कसे घाबरले ऑस्ट्रेलियन खेळाडू...