आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli And Anushka Sharma May Get Engaged In New Year

नव्‍या वर्षात विराट-अनुष्‍का करणार साखरपुडा, कॅटरिना-रणबीरचीही चर्चा जोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड आणि क्रिकेटच्‍या विश्‍वातून एक मोठी बातमी आहे. भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा लवकरच साखरपुडा होणार असल्‍याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरी बातमी म्‍हणजे, रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचाही नव्‍या वर्षात साखरपुडा होण्‍याची शक्‍यता आहे. विराट कोहली सध्‍या दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहे. सुत्रांच्‍या माहितीनुसार, तो नवे वर्ष साजरे करण्‍यासाठी मुंबईत येऊ शकतो. त्‍याचवेळी तो अनुष्‍कासोबत साखरपुडा करणार आहे.

विराट आणि अनुष्‍का यांच्‍यातील प्रेमप्रकरणाची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. परंतु, त्‍यांनी अफेअर नसल्‍याचे अनेकदा सांगितले होते. आम्‍ही फक्त चांगले मित्र असल्‍याचे ते सांगतात. काही दिवसांपूर्वीच विराट अनुष्‍काच्‍या घरी गेला होता. एवढेच नव्‍हे तर अनुष्‍काला 'बाय बाय' करताना दोघांना किस करतानाही पाहिले होते. दोघांना अनेकदा सोबत फिरतानाही पाहिले आहे. तरीही दोघे फक्त मित्र असल्‍याचे सांगतात.

विराट कोहली यापूर्वी ब्राझीलची मॉडेल इझाबेल लिटीसोबत डेट करत होता. अनुष्‍कादेखील सुरुवातीला रणवीर सिंहला डेट करत होती.

कुठे होणार कॅट-रणबीरचा साखरपुडा... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...