आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPOTTED: अनुष्काला डिनरसाठी घेऊन गेला विराट, कुटुंबाचीही ओळख करुन दिली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर विराट कोहली सध्या गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत दिल्लीत आहे. नुकताच तो त्याच्या रेंज रोव्हर कारमध्ये दिपीकासोबत दिसला होता. दोघे एका रेस्तराँमध्ये डिनरसाठी गेल्याची चर्चा होती. विराट कोहली आता काही दिवस दिल्लीतच राहाणार आहे, त्यानतंर 3 एप्रिल रोजी सुरेश रैनाच्या विवाहासाठी जाणार आहे.
अनुष्काने घेतली विराटच्या कुटुंबियांची भेट
ऑस्ट्रेलियाहून विराटसोबत परतलेली अनुष्का सध्या दिल्लीत त्याच्यासोबतच आहे. दरम्यान तिने विराटच्या कुटुंबियांची भेट घेतली. विराट कोहलीचे दिल्लीतील मीरा बाग भागात घर आहे. विराट तीन एप्रिल रोजी सुरेश रैनाच्या विवाहासाठी लखनौला जाणार आहे. त्याच्यासोबत अनुष्काही राहिल किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनल सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. या सामन्यावेळी अनुष्का प्रेक्षकांमध्ये बसलेली होती. या सामन्यात तिचा मित्र विराट शुन्यावर बाद झाला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्कावर निशाणा साधला होता. चाहत्यांनी या पराभवासाठी अनुष्का आणि विराटलाच जबाबदार ठरविले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अनुष्का आणि विराटसोबत असलेली छायाचित्रे