आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Virat Kohli And Ben Stokes Involved In Verbal Spat On The Creas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट कोहली आणि स्‍टोक्‍स यांच्‍यामध्‍ये बाचाबाची, पंचांच्‍या हस्‍तक्षेपाने टळला वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टिप्‍पणी केल्‍यानंरत रागाने पाठीमागे वळून पाहताना विराट कोहली)

नॉटिंगहम - जडेजा आणि अँडरसन वाद निवळत नाही तोच पुन्‍हा नवा वाद समोर आला आहे. भारतीय फलंदाज विराट कोहली आणि इंग्‍लडचा वेगवान गोलंदाज बेन स्‍टोक्‍स यांच्‍यामध्‍ये बाचाबाची झाली. कोहली 40 धावा काढून बाद झाल्‍यानंतर ड्रेसिंग रुममध्‍ये परततत असताना स्‍टोक्‍सने काही टिप्‍पनी केली. तेव्‍हा चवताळलेला विराट बॅट उगारून स्‍टोक्‍सकडे जात होता.
टीव्‍ही रिप्‍ले मधून झाले स्‍पष्‍ट
स्‍टोक्‍सने कोहलीला चिडवण्‍याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यामुळेच रागावलेला विराट त्‍याच्‍याकडे जात होता. मैदान सोडताना विराटने एकदाही मैदानाकडे वळून पाहिले नाही. स्‍टोक्‍स काय म्‍हणाला याविषयी अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. मात्र टीव्‍ही रिप्‍लेमधून स्‍पष्‍ट जाणवत होते की, विराट आणि स्‍टोक्‍समध्‍ये काहीतरी बिनसले आहे.

पंचांनी केला हस्‍तक्षेप
मैदानावर उपस्थित पंच मायकल गाफ यांनी पाल रिफेल यांनी कर्णधार आणि स्‍टोक्‍सला बोलावून प्रकरण शांत केले. भलेही भारताने हा सामना सहा विकेटने जिंकला. आणि मालिकेत 2-0 ने आघाडी मिळविली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विराट आणि स्‍टोक्‍समधील वादाचे संपूर्ण प्रकरण