आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वनडे क्रमवारी : विराट तिस-या, धोनी चौथ्या स्थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - भारताचा विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानी कायम आहेत. गोलंदाजीत एकही भारतीय गोलंदाज टॉप-20 मध्ये स्थान पटकावू शकला नाही.
विराटच्या नावे सध्या 848 रेटिंग गुण आहेत. दुसरीकडे धोनीच्या नावे 752 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला 871 गुणांसह नंबर वन स्थानी कायम आहे. विराट आणि धोनीनंतर भारतीय खेळाडूंत गौतम गंभीर सातव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लोनवाबो त्सोत्सोबे पहिल्या तर पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल दुस-या आणि आफ्रिकेचाच मोर्ने मोर्केल तिस-या क्रमांकावर आहे.
टीम रँकिंगमध्ये भारत तिस-या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलिया नंबर वन असून, आफ्रिका दुस-या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा संघ पाचव्या तर पाकिस्तानची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांत पाच गुणांचे अंतर असून, येत्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी करून दोन्ही संघांना क्रमवारीत प्रगतीची संधी आहे.