आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, धोनीनंतर विराट कोहलीची नवी इनिंग; झाला बीएसएफचा ब्रँड अ‍ॅम्‍बेसिडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार विराट कोहलीने वरिष्‍ठ खेळाडुंच्‍या पावलावर पाऊल ठेवले आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्‍याप्रमाणेच कोहलीनेही भारतीय सैन्‍याशी जुळण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. विराट कोहलीला सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) ब्रँड अ‍ॅम्‍बेसिडर म्‍हणून निवडण्‍यात आले आहे. केंद्रीय गृहराज्‍य मंत्री आरपीएन सिंह आणि बीएसएफचे प्रमुख सुभाष जोशी यांनी रविवारी एका कार्यक्रमात बीएसएफची मानाची हॅट आणि जॅकेट देऊन गौरव केला.

सचिन तेंडुलकर वायुसेनेचा ब्रँड अ‍ॅम्‍बेसिडर झाला होता. तर धोनी सैन्‍याचा. आता कोहली बीएसएफचा सदस्‍य झाला आहे.

विराट कोहली सध्‍या तरुणांमध्‍ये प्रचंड लोकप्रिय आहे. सध्‍या तो विविध उत्‍पादनांच्‍या जाहिराती करताना दिसतो. परंतु, आता तो सीमेवर तैनात जवानांची वीरगाथा सांगताना दिसणार आहे. बीएसएफच्‍या जवानांना सीमेवर भेटण्‍यासाठी जाण्‍यास इच्‍छूक असल्‍याचे तो म्‍हणाला. जवानांचे मनोधैर्य उंचावण्‍यासाठी शक्‍य होईल, ते करु, असे तो म्‍हणाला.

पुढे क्लिक करा आणि पाहा विराट कोहलीचा नवा अवतार...