आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गजांना कोहली वरचढ; पाच वर्षांत जाणार सचिनच्‍या पुढे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वयाच्या 24 व्या वर्षी 15 वनडे शतके ठोकून नवा रेकॉर्ड केला. त्याने सचिन तेंडुलकरचा 14 शतकांचा विक्रम मोडला. विराटने बुधवारी हरारेत आपले 15 वे शतक झळकावले. या वेळी कोहलीने कपिलदेवचासुद्धा विक्रम मोडला.

विराटने 15 व्या शतकाचा प्रवास अवघ्या 106 डावांत पूर्ण केला. त्याच्या 15 शतकांपैकी 14 वेळा भारताने विजय मिळवला. कोहलीने शतक ठोकल्यानंतर भारताचा फक्त एक वेळा पराभव झाला. वयाच्या 24 व्या वर्षी शतके ठोकण्याच्या यादीत क्रिस गेल (9 शतके) तिसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा सलमान बट्ट आणि श्रीलंकेचा उपुल थरंगा प्रत्येकी 8 शतकांसह चौथ्या स्थानावर आहेत.