आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WC च्या पराभवाबाबत विराट म्हणाला, वाईट वागला तुम्ही, लाज वाटायला हवी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने वर्ल्ड कप 2015 च्या सेमीफायनलच्या सामन्यादरम्यान केलेल्या खराब कामगिरीबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात विरा केवळ 1 धावेवर बाद झाला होता. त्याच्या खराब कामगिरीला सिडनेतील मैदानात उपस्थित असलेल्या त्यांची गर्लफ्रेंड अनुष्‍का शर्माला जबाबदार धरले होते. सोशल मिडियातून या कपल्सवर जोरदार चर्चा झाली होती. याबाबत प्रथमच भाष्य करताना विराट म्हणाला, आमच्याबाबत जे काही बोलले गेले ते खूपच वाईट होते. मला त्यामुळे धक्का बसला आहे. असे बोलणा-यांना काहीतरी लाज वाटायला हवी. विराट सध्या आयपीएलमध्ये बिझी आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार आहे.
विराट म्हणाला, “ आम्ही सामना गमावल्यानंतर जे काही झाले त्यामुळे मी निराश होतो. मी सतत चांगला खेळ केला. मात्र एका सामन्यात अपयशी ठरताच लोक अशा चुकीच्या प्रतिक्रिया देतात. अशामुळे आपला लोकांवरचा विश्वास कमी होत जातो. सोशल मीडियावर फॅन्सनी खूपच अभद्र टिप्पणी केल्याबाबत विराट म्हणाला, ते पाहून मी खूपच नाराज होतो. अशा टीकाटिप्पणी करायला त्यांना लाज वाटायला हवी होती.

फॅन्सनी लक्ष्य केले होते अनुष्का-विराटला-
आपल्याला आठवत असेलच की वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेतील सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली केवळ 1 धावेवर बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाचा सामना हरल्यानंतर सोशल मीडियात विराट आणि त्यांची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला या पराभवासाठी जबाबदार धरले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा 95 धावांनी दारूण पराभव केला होता. सिडनीत झालेल्या सामन्याला अनुष्का शर्मा उपस्थित होती तर विराट अपयशी ठरला होता. यानंतर केवळ विराट कोहलीच्या कामगिरीलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय संघाच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरले होते. यानंतर क्रिकेट, बॉलिवूडमधील मंडळींनी अनुष्का-विराटचा बचाव करीत या जोडीला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगितले.