आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Can Be Better Than Sachin Tendulkar: Kapil Dev News In Marathi

विराट सर्व विक्रम मोडणार : कपिलदेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - विराट जर प्रदीर्घ काळ दुखापतीविना खेळू शकला तर फलंदाजीतील सचिनसह अनेकांचे विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची त्याची क्षमता असल्याचे भारताचा माजी कर्णधार कपिलदेव यांनी म्हटले आहे.

दुसरा डॉन ब्रॅडमन बनणे किंवा सचिन बनणे अशक्य असले तरी विराट हा फलंदाजीतील अनेक विक्रम मोडीत काढू शकतो, असा विश्वास कपिलने नमूद केले. 24 वर्षांच्या तरुणाकडे प्रचंड प्रतिभा दिसणे दुर्मिळ असते. त्यामुळेच तो कदाचित सचिनचेही अनेक विक्रम मोडू शकेल, असेही कपिल म्हणाला. भारताऐवजी काही आयपीएल सामने अरब अमिरातमध्ये खेळवणे हे निश्चितच फायद्याचे ठरणार आहे. विविध देशांमध्ये आयपीएल खेळवले गेल्यास त्या देशांमध्येही क्रिकेटच्या प्रसारास मोठय़ा प्रमाणात मदतच मिळणार आहे,असेही त्याने या वेळी सांगितले.

सचिनपेक्षा अधिक सरस ठरेल
विराट जर अशाच स्वरूपाच्या तंदुरुस्तीसह 32 ते 34 व्या वर्षापर्यंत खेळू शकला, तर तो सचिनपेक्षाही अधिक विक्रम प्रस्थापित करेल. संघ एकाच खेळाडूकडून वर्षानुवष्रेअपेक्षा बाळगू शकत नाही, मात्र विराट दशकभर तरी योगदान देऊ शकतो.