एडिलेड ओव्हल मैदानावर तब्बल 22 वर्षांनंतर
विराट कोहली अॅण्ड कंपनीचा विजयाच्या उंबरठ्यावर परभव झाला. 25 जानेवारी 1992 ला मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्त्वाखाली
टीम इंडियाला असाच पराभवाचा सामना करावा लागला होता. फरक फक्त धावांचा आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 48 धावांनी परभव केला आहे. मात्र, या पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने अनेकांची मने जिंकली आहे. कोहलीचे 'विराट' रुप सगळ्यांनी पाहिले.
अग्रेसिव्ह एटीट्यूड
कर्णधार विराट कोहलीचे नेतृत्त्व वाखाणण्यासारखे आहे. कोहलीने मिळालेल्या संधीचे सोने केले. कधीच तो हताश दिसला नाही. लढतीच्या पहिल्या चेंडूपासून अंतिम निर्णयापर्यंत विराटने
आपल्या सहकार्यांमध्ये विजयाचा विश्वास कायम ठेवला. विराटने त्याच्यातील अग्रेसिव्ह एटीट्यूड दाखवून पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांना माजी कर्णधार सौरव गांगुली आणि कपिल देवसारख्या माजी कर्णधारांची आठवण करून दिली.
टीम इंडियाने सामना गमावल्यानंतरही त्यांच्या पराभवाची नाराजी दिसली नाही. टीम इंडियाला 2011-12 मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात मोठा नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघातील पहिल्या सत्रात गुडघे टेकले होते. संपूर्ण संघात नकारत्मक भावना पसरली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, विराट कोहलीमध्ये 'परफेक्ट' कर्णधाराचे गुण...