आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीच्‍या चार हजार धावा पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज विराट कोहलीने वनडे करिअरमधील आपल्‍या चार हजार धावा पूर्ण केल्‍या आहेत. सर्वात वेगाने चार हजार धावा पूर्ण करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. इंग्‍लंडविरूद्धच्‍या तिस-या वनडेमध्‍ये त्‍याने 21 व्‍या षटकातील पहिल्‍याच चेंडूवर 2 धावा घेऊन आपल्‍या करिअरमधील आणखी एक महत्‍वाचा टप्‍पा ओलंडला.


या धावा त्‍याने आपल्‍या 96 व्‍या सामन्‍यात पूर्ण केल्‍या. चार हजार धावांबरोबरच त्‍याने आपले 21 वे अर्धशतकही पूर्ण केले. विराटने आता 96 एकदिवसीय सामन्‍यात 50.35 च्‍या सरासरीने 4028 धावा पूर्ण केल्‍या आहेत.