आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Concentrate On Cricket News In Marathi

सध्या विराटचे लक्ष क्रिकेटकडे : सरोज कोहली, एका मराठी अभिनेत्रीही कोहलीच्या प्रेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विराट कोहली सध्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरीने चांगलाच चर्चेत आहे. यातच इंग्लंडच्या डॅनियल वॅटच्या लग्नाची मागणी करणा-या ट्विटमुळे तर या चर्चेला अधिकच ऊत आला आहे. मात्र, या सर्वांवर त्याची आई सरोज कोहली यांनी पडदा टाकला आहे. विराट कोहलीच्या लग्नाचा विचार अति घाईत घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वॅटची इच्छाही सध्या तरी अपूर्णच राहणार असल्याचे चित्र आहे.
‘सध्या विराटचे पूर्ण लक्ष क्रिकेटकडेच आहे. त्याचे आता लग्नाचे वय नाही,’ अशा शब्दांत सरोज कोहली यांनी प्रतिक्रिया दिली.
आयसीसी वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य लढतीत विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली.या खेळीवर फिदा झालेल्या डॅनियल वॅटने लग्नाची मागणी करणारे ट्विट केले होते. यापूर्वी विराट कोहलीचे नाव सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नेहमीच जुळलेले असते. मात्र, यात आता डॅनियल वॅट आणि एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे जगजाहीर झाले. भारताचा तारणहार कोहलीवर अनेक युवती फिदा असल्याचे समोर येत आहे.