आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Drops In ICC Test Ranking, Dhoni Rises, News In Marathi

ICC रँकिंग: बांगलादेशी क्रिकेटपटूने आर. अश्विनला मागे टाकत बनला 'नंबर वन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - इंग्‍लंडविरुध्‍द कसोटी मालिकेदरम्‍यान आर. अश्विन)
दुबई - इंग्लंडविरुद्ध मालिकेतील लाजिरवाण्या पराभवाचा फटका भारतीय खेळाडूंच्‍या मानांकनालाही बसला. कसोटीतील अष्‍टपैलू रॅंकिंगमध्‍ये नंबर वन असलेला आर. अश्विन दुस-या स्‍थानी ढकलला गेला असून त्‍याची जागा बांगलादेशच्‍या शाकिब अल हसनने घेतली आहे. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीची बॅटींग रॅकींमध्‍ये सुधारणा झाली आहे.

धोनीची रँकींगमध्‍ये सुधारणा तर पुजारा-कोहली घसरले
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या मालिकेमध्‍ये चार अर्धशतके लगाल्‍याने त्‍याचा त्‍याला फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत फलंदाजांच्‍या यादीमध्‍ये तो 28 व्‍या स्‍थानी आहे.
चेतेश्‍वर पुजारा टॉप 15 फलंदाजातून बाहेर पडला असून गर्लफ्रेंडमुळे चर्चेत असलेला विराट कोहली रॅकिंगमध्‍ये पाच स्‍थानाने घसरण झाली आहे.
श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा कसोटी क्रमवारीत पहिल्‍या क्रमाकांवर आहे. तर दुस-या स्‍थानी एबी डिविलियर्स आहे.
आयसीसी रॅकिंगमध्‍ये भारताचे टॉप फलंदाज आणि गोलंदाज-
नंबर खेळाडू वर्ल्ड रँकिंग
फलंदाज

1. चेतेश्वर पुजारा 16
2. विराट कोहली 26
3. महेंद्र सिंह धोनी 28
4. मुरली विजय 34
5. अजिंक्य रहाणे 43

गोलंदाज
खेळाडू वर्ल्ड रँकिंग

1. आर अश्विन 13
2. प्रज्ञान ओझा 15
3. इशांत शर्मा 20
4. जहीर खान 22
5. रवींद्र जडेजा 27
आईसीसी रँकिंगमध्‍ये टॉप 5 ऑलराउंडर
1. शाकिब अल हसन (बांगलादेश)
2. आर अश्विन (भारत)
3. वर्नॉन फिलेंडर (दक्षिण आफ्रिका)
4. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
5. मिचेल जॉनसन (ऑस्ट्रेलिया)
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारताचे रँकीमधील स्‍थान