आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli First Indian To Get A Century Against Pakistan In World Cup

विश्‍वचषकात पाकविरुध्‍द कोहलीची \'विराट\' पारी, सचिनचा विक्रम मोडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड (ऑस्ट्रेलिया) - विश्‍वचषकात पाकिस्‍तानविरुध्‍द खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यात भारताच्‍या तरुण तडफदार विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत शतक पूर्ण केले. या शतकाच्‍या बळावरच भारताने 300 धावांचा डोंगर उभा केला. विराटच्‍या या खेळीने मास्‍टर ब्‍लॉस्‍टर सचिन तेंडूलकरचा विक्रमही मोडित निघाला आहे.
विराट कोहलीने 126 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 4 षटकारांच्‍या सहाय्याने 107 धावा केल्‍या. 119 चेंडूत त्‍याने शतक पूर्ण केले. विश्‍वचषकात पाकिस्‍तानविरुध्‍द भारताकडून सचिन तेंडूलकरने 98 धावांची सर्वोच्‍च खेळी केली होती. विराटने शतक झळकावून नवा विक्रम प्रस्‍थापीत केला आहे.
कोहलीने केली विक्रमी खेळी
* विश्‍वचषकामध्‍ये उभय देशांमध्‍ये सर्वांधीक धावा करणारा फलंदाज. यापूर्वी पाकिस्‍तानच्‍या सईद अन्‍वरने 101 धावा केल्‍या होत्‍या.
* विराटने पाकिस्तानविरुध्‍द विश्‍वचषकात शिखर धवनच्‍या साथीने 129 धावांची विक्रमी भागीदारी केली.
* भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये सर्वांधीक शतक झळकावण्‍यामध्‍ये विराट दुस-या स्‍थानी आहे. यापूर्वी सौरव गांगूलीने 22 शतके लगावली आहेत. विराटच्‍या नावेही 22 शतके नोंदवली गेली आहेत. सचिन सचिन 49 एकदिवसीय शतकांसह वर्ल्ड क्रिकेटमध्‍ये टॉपर आहे.
*अॅडिलेड ओव्‍हलमध्‍ये कोहलीचे हे चौथे शतक आहे. उर्वरीत तीन शतके त्‍याने कसोटीमध्‍ये लगावली आहेत.
शतकानंतर काय म्‍हणाला कोहली
''ओव्‍हल माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. विकेटवर फलंदाजी करने पाहिजे तेवढे सोपे नाही. परंतु, सुरेश रैनाने (74 धावा 56 चेंडू) धावा करुन 300 धावांचा डोंगर उभारला. तिरंगी लढतीमध्‍ये मी मोठे फटके मारण्‍याचे प्रयत्‍न केले होते. परंतु, आज मी मला सेट होण्‍यासाठी वेळ दिला. ही खेळी माझ्यासाठी अविस्‍मरणीय अशीच आहे.'' -विराट कोहली
पुढील स्‍लाइडवर पाहा, विराट कोहलीचे रोमहर्षक छायाचित्रे...