आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामना सुरू असतानाच विराटला भर मैदानात आली जबरदस्‍त 'ऑफर'

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियासाठी ऑस्‍ट्रेलियाचा दौरा खूप निराशजनक ठरला. याला अपवाद राहिला तो टीम इंडियाचा उमदा फलंदाज विराट कोहली. त्‍याने या दौ-यात आपल्‍या फलंदाजीने आणि वर्तणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिडनी क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांशी घातलेली हुज्‍जत असो किंवा त्‍याचे तडफदार शतक असो. दोन्‍ही क्षेत्रात त्‍याने आपण कमी नसल्‍याचे दाखवून दिले. श्रीलंकेविरूद्धच्‍या होबार्ट एकदिवसीय स्‍पर्धेत देखील त्‍याच्‍या बाबतीत अशीच लक्षवेधक घटना घडली.
कोहलीचा महिला चाहता वर्ग मोठयाप्रमाणात आहे हे सर्वांना ठाऊकच आहे. याचा अनुभव त्‍याला ऑस्‍ट्रेलिया दौ-यातही आला. त्‍याला सातत्‍याने अनेकांकडून प्रेमाच्‍या ऑफर येत असतात. होबार्ट वनडेतही असाच किस्‍सा त्‍याच्‍याबाबतीत घडला. श्रीलंकेच्‍या फलंदाजीवेळेस क्षेत्ररक्षण करणा-या कोहलीला एका मुलीने प्रेमाचा प्रस्‍ताव ठेवला आणि आपल्‍या घरी येण्‍याचे निमंत्रणही त्‍याला दिले होते. सीमारेषेजवळ एक मुलगी बॅनर घेऊन बसली होती आणि तिने त्‍यावर offer still stands kohli, my place tonight?
पूर्वीपासून कोहलीच्‍या बॉलिवूडमधील किस्‍स्‍यांची चर्चा मोठयाप्रमाणात होते. सध्‍या कोहली आणि कन्‍नड अभिनेत्री संजनाच्‍या मैत्रीची चर्चा जोरात सुरू आहे.
षटकारांच्‍या आतषबाजीने युसूफ पठाणने वेधले निवडकर्त्‍यांचे लक्ष
अनिल कुंबळेने घेतली युवराज सिंगची भेट