आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट रसिकांवरील विश्वास उडाला : विराट कोहली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - विराट कोहलीने वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बातचीत केली. सेमीफायनलमधील पराभवानंतर आपला खेळ आणि अनुष्का शर्माबाबत क्रिकेट रसिकांनी मारलेल्या टोमण्यांबाबत त्याने दु:ख व्यक्त केले. अर्थात त्याच्या म्हणण्यात भावुकतेपेक्षा रोषच जास्त होता.

सोशल मीडियात अनुष्कावर झालेल्या टीकेवर विराट म्हणाला,‘मला खूपच दु:ख झाले आहे. ज्या लोकांनी अशी प्रतिक्रिया दिली त्यांना लाज वाटायला हवी. फक्त एका सामन्यातील कामगिरीनंतर अशी प्रतिक्रिया निराशाजनक होती. त्यामुळे अनेक व्यक्तींवरील तुमचा विश्वास उडतो.’ माध्यमे आणि टीकाकारांबाबत कोहली म्हणाला,‘गेल्या पाच वर्षांत मी भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. इतरांच्या तुलनेत मी सातत्याने चांगला खेळलो.

जर मी दोन सामन्यांत चांगला खेळलो नाही तर तो खराब फॉर्म असतो. इतर कोणी १० पैकी २ सामन्यांत चांगला खेळला तर म्हणतात तो फॉर्ममध्ये आहे.’ सेमीफायनलमध्ये विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक धाव काढून बाद झाला होता. त्यानंतर विराट-अनुष्कावर प्रचंड टीका झाली होती. त्याच्या या वक्तव्यानंतर लोक पुन्हा सोशल मीडियावर सल्ला देत आहेत.

टीका सहन करणे सचिन, धोनीकडून शीक...
- बेबी विराट कोहली, सचिन किंवा कर्णधार धोनीकडून तरी काही शिकवण घेतली असती @तृप्तीरावत

- टीका सहन कशी करायची याची शिकवण विराटने सचिनकडून घ्यावी @संशुमान

- विराट, तू ‘आय, मी, मायसेल्फ’पेक्षा वेगळा विचार करण्याची गरज आहे. @स्वातीराजळे

- दु:ख झाले तर घरी बैस. तुझ्यापेक्षा उत्कृष्ट टॅलेंट बाहेर बसून प्रतीक्षा करत आहे. @ धात्री९९

- विराट, रसिकच तुमच्यासारख्या खेळाडूंना देव आणि हीरो बनवतात, लक्षात ठेव. @राजाबाबू

- विराट, तू क्रिकेटपेक्षा आणि टीम इंडियापेक्षा मोठा नाहीस. स्वत:ची आरती ओवाळू नकोस. @कृपालआर

- वेळ आणि पैसे खर्च करून आम्ही रसिक तुमचा सामना आणि चित्रपट पाहायला जातो @अर्जुन-82

- विराट, आमची प्रशंसाच कोट्यवधींचा व्यवसाय देते, नाराजी तर सहन करावी लागेल. @परम लोवे