आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबावात कोहलीच्या प्रतिभेला चमक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही खेळाडूची किती सर्वर्शेष्ठ कामगिरी करण्याची क्षमता आहे, हे दबावातच समजते. विराट कोहलीचेच उदाहरण घ्या. त्याने तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्ध दबावात शतक ठोकले. धोनीच्या जागी कोहली संघाचे नेतृत्व करीत होता आणि र्शीलंकेविरुद्ध भारताचा पराभव झाल्याने त्याच्यावर दबाव होता. इतकेच नव्हे तर भारताची कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे झाली नव्हती. विराटबद्दल बोलायचे झाल्यास त्याची फलंदाजी सशक्त आणि खास असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. र्शीलंकेने भारताची सहजपणे शिकार केल्यामुळेसुद्धा कोहलीवर दबाव होता. वेस्ट इंडीजविरुद्ध करा वा मरा अशी परिस्थिती असलेल्या सामन्यात कोहलीने शानदार नेतृत्व केले आणि गोलंदाजांचा योग्य उपयोग केला. या सामन्यात टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी लय मिळाल्याचे वाटले. तिरंगी मालिकेत भारताच्या सुमार कामगिरीने बरेच जण चकित होते. एका आठवड्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत चॅम्पियनप्रमाणे खेळणार्‍या टीम इंडियाला तिरंगी मालिकेत काय झाले, हे कळत नव्हते. माझ्या मते, असा विचार करणार्‍यांना आता उत्तर मिळाले आहे. खरे तर कोणत्याही सर्वर्शेष्ठ संघाची कामगिरी थोड्या वेळेसाठी घसरू शकते. मात्र, त्यांना पुन्हा लयीत येण्यासाठी वेळ लागत नाही.

तिरंगी मालिकेतील आपल्या दुसर्‍या सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली नव्हती. र्शीलंकेविरुद्ध सामन्यात बचावात्मक खेळण्याचा फटका भारताला बसला. याविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती. तसे बघितले तर गेल्या आठ महिन्यांपासून भारतीय खेळाडू सलगपणे क्रिकेट खेळत आहेत. विर्शांती त्यांच्या नशिबी नाही. अशा परिस्थितीत विजयी लय कायम ठेवणे सोपे काम नाही. आता टीम इंडियाचा पुढचा सामना 9 जुलै रोजी र्शीलंकेशी होईल. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. ज्या संघाला विजयाची सवय झाली, तो संघ मागे कसा राहील?

मला पुन्हा विराट कोहलीबाबत बोलायचे आहे. झिम्बाब्वे दौर्‍यासाठी त्याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. धोनीप्रमाणे कोहलीनेसुद्धा विर्शांती घ्यायला हवी, असे माझे वैयक्तिक मत आहे. कोहलीसुद्धा धोनीप्रमाणे तिन्ही स्वरूपात दोन वर्षांपासून सलग क्रिकेट खेळतोय. निवड समितीच्या मताप्रमाणे 2015 च्या वल्र्डकपवर त्यांचे लक्ष आहे आणि नव्या युवा खेळाडूंना झिम्बाब्वे दौर्‍यात अनुभव मिळेल.

कोहलीलासुद्धा नेतृत्व सुधारण्याची संधी असेल. माझ्या मते निवड समितीने हरभजनसिंग, जहीर खान, वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग यांच्या फॉर्मवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण यांच्यासारखे दज्रेदार खेळाडू सहज उपलब्ध होत नाहीत. झिम्बाब्वेसाठी घोषित झालेल्या संघात जम्मू-काश्मीरचा ऑफस्पिनर परवेज रसूलचीही निवड झाली आहे. जम्मू-काश्मिरात सामाजिक-राजकीय घटनांचा सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे यावरून लक्षात येते.