आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Latest ODI Test Record News In Marathi

फक्‍त 40 दिवसांचा खेळ! विदेशामध्‍ये \'हीरो\' चा \'‍झिरो\' ठरला विराट कोहली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - साउथम्‍पटन कसोटीमध्‍ये बाउंन्‍स चेंडूचा सामना करताना तोल ढासळून पडलेला विराट कोहली)
भारताचा दिग्‍गज आणि आश्‍वासक चेहरा विराट कोहली 40 दिवसांमध्‍ये 'झिरो' ठरला आहे. इंग्‍लडमध्‍ये झालेल्‍या खराब प्रदर्शनामुळे विराटची प्रतिमा मलिन झाली आहे. सहा वर्षांपूर्वी 18 ऑगस्‍ट रोजी त्‍याने आपल्‍या करिअरला सुरुवात केली होती.
पदार्पनामध्‍ये मध्‍यगतीने धावा घेणारा विराटचा करिअर आलेख वेगाने चढत गेला. त्‍याने दिग्‍गजांचे विक्रम मोडित काढले. आणि भारतासाठी आश्‍वासक चेहरा बनला. परंतु विदेशी मैदानावर त्‍याचे प्रदर्शन खालावले.
एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये पदार्पन
कोहलीने दांबुलामध्‍ये श्रीलंकेविरुध्‍द 18 ऑगस्‍ट 2008 रोजी एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये पदार्पन केले. केवळ 12 धावांमध्‍ये तो LBW बाद झाला होता.
25 वा वाढदिवस साजरा केल्‍यानंतर विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील कित्‍येक विक्रम मोडीत काढले. सर्वांत जलद गतीने 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. तसेच त्‍याने सर्वांत कमी पारींमध्‍ये 19 शतके लगावली. 21 नोव्‍हेंबर 2013 रोजी त्‍याने सर विवियन रिचर्ड्स यांचा सर्वांधीक 5000 धावा बनविण्‍याच्‍या विक्रमाची बरोबरी केली.
टेस्‍टमध्‍ये झाला 'फेल'
एकदिवसीय सामन्‍यांध्‍ये उत्‍कृष्‍ठ कामगिरी केलेला विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्‍ये आपली हवी तशी छाप पाडू शकला नाही.
2011 च्‍या वेस्‍ट इंडील दौ-यावर त्‍याने 15.20 च्‍या सरासरीने एकूण 76 धावा केल्‍या. त्‍यांनतर त्‍याने इंग्लंडविरुध्‍द पाच सामन्‍यांमधील 10 पारींमध्‍ये त्‍याने 13.40 च्‍या सरासरीने 134 धावा केल्‍या.
कोहलीने ऑस्‍ट्रेलिया, न्‍युझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्‍द कसोटीमध्‍ये शतकी खेळी केली परंतु इंग्‍लंड दौ-यावर त्‍याची प्रतिमा खालावली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, विराटचे 'हिरो' ते 'झिरो' ठरलेले प्रदर्शन..