आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Launches His 3d Animated Avatar, Latest News In Marathi

\'सुपरहिरो\' बनला विराट कोहली! 3D अवतारात मुलांच्‍या इशा-यावर करणार व्हिलनची \'धुलाई\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: 3D अॅनिमेटेड कॅरेक्टर लॉन्चिंगच्‍या वेळी विराट कोहली

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेटमधील स्‍टार फलंदाज विराट कोहली सध्‍या लोकप्रियतेच्‍या शिखरावर आहे. लहानमुलांमध्‍ये त्‍याची क्रेझ आहे. त्‍याच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेचा फायदा गेमिंग वेबसाइटने घेतला असून त्‍यांनी विराटला 3D स्‍वरुपात बाजारात आणले आहे. या गेममध्‍ये मुलांच्‍या इशा-यावर विराट व्हिलनची धुलाई करणार आहे.
पहिला क्रिकेटपटू
3D अॅनिमेटेड कॅरेक्‍टर बनविण्‍यात आलेला विराट पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. विराटच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने श्रीलंकेला क्‍लीनस्‍वीप दिला.
काय म्‍हणाला विराट
3D कॅरेक्‍टर लॉन्चिंग प्रोग्रॅममध्‍ये विराट म्‍हणाला की, सुपर हिरो व्हिलनची धुलाई करत असतात. आता माझे कॅरेक्‍टर तसे बनविण्‍यात आले आहे. परंतु ख-या आयुष्‍यात मी सुपरहिरो आहे का ? याविषयी मला माहिती नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विराट कोहलीची 3D अॅनिमेटेड कॅरेक्‍टर लॉन्चिंग कार्यक्रमातील छायाचित्रे..