आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Leads The Way With Ton, India Beat West Indies To Stay Afloat

विंडीजवरील विजयाने मालिकेत भारताच्या आशा जिवंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - कर्णधार विराट कोहलीच्या 102 धावा आणि नंतर गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारताने वेस्ट इंडीजला 102 धावांच्या ‘विराट’ अंतराने मात दिली. या विजयासह तिरंगी मालिकेतील भारताच्या आशा अद्याप जिवंत आहेत. सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमाने लागला. भारताने 7 बाद 311 धावा काढल्या होत्या. वेस्ट इंडीजने सुधारित 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 171 धावा काढल्या. भारताचा पुढचा सामना आता 9 जुलै रोजी श्रीलंकेशी होईल.

वेस्ट इंडीजकडून जॉन्सन चाल्र्सने सर्वाधिक 45 धावा काढल्या. चाल्र्सने आपल्या डावात 39 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 6 चौकार मारले. तळाचा फलंदाज केमर रोचने 34 आणि सुनील नरेनने 21 धावा काढून अखेरीस थोडे प्रयत्न केले. मात्र, मधल्या फळीच्या फलंदाजांचे अपयश संघाला भोवले. भारताकडून भुवनेश्वरकुमारने 29 धावांत 3 तर उमेश यादवने 32 धावांत 3 गडी बाद केले. ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी भारताकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी करताना 102 धावा काढल्या. विराटचे हे 14 वे वनडे शतक होते. सलामीवीर धवनने 69 आणि रोहित शर्माने 46, मुरली विजयने 27 धावा काढल्या. अश्विनने नाबाद 25 धावा जोडल्या. विंडीजकडून टीनो बेस्टने 2 गडी बाद केले. तर रोच, डेवेन ब्राव्हो, सॅम्युअल्स व पोलार्डने प्रत्येकी एक विकेट घेतली.