आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा मैदानावरील आणि मैदानाबाहेरील विराटच्‍या खास गोष्‍टी...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली दमदार सुरुवात वाखाणण्याजोगी आहे. त्याला दबावात खेळणे आवडते. त्याचे म्हणणे आहे की, ‘जेव्हा माझ्यावर एखादी जबाबदारी असते तेव्हा मी चांगला खेळ करण्यासाठी प्रेरित होतो.’ क्रिकेट खेळण्याची त्याची एक वेगळी स्टाइल आहे. तो मैदानावर आक्रमक आणि गंभीर असतो, परंतु मैदानाबाहेर तो मौजमजादेखील करतो. त्याची गणना आज जगातील उत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. विराट स्टारडमच्या झगमगाटापासूनही दूर नसून तो सुमारे 15 ब्रँड्सना एंडोर्स करत आहे. त्याला नुकतेच 2012 साठी ‘सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याने लोकप्रियतेचे शिखर खूप कमी कालावधीत गाठले आहे. तो आणखी उंच भरारी घेण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे. भारतीय क्रिकेट रसिकांना विराटकडून खूप अपेक्षा आहेत. कोणी त्याला पुढील सचिन तर कोणी भारतीय क्रिकेट संघासाठी भविष्यातील कर्णधार असल्याचे म्हणतो.

लहानपणी खूप बॅट तोडल्या

बाद झाल्यावर विराट रागाच्या भरात पुटपुटत खेळपट्टीवरून पॅव्हेलियनकडे जातो. याबाबत एका मुलाखतीदरम्यान त्याला विचारले असता मला ही सवय लहानपणापासून असल्याचे त्याने सांगितले. शून्यावर बाद झाल्यावर त्याला राग येतोच, पण शतक ठोकल्यावर बाद झाल्यानंतरही त्याला राग येतो. लहानपणी रागाच्या भरात खूप बॅट तोडल्याचे विराट सांगतो.