आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली मोडू शकतो रिचर्ड्सचा ‘विराट’ विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकदिवसीय क्रिकेटमधला नवा तारा विराट कोहली महान माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडू शकतो. वनडेत वेगवान 5000 धावांचा विक्रम त्यांच्या नावे आहे. विराट आता अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे. 118 एकदिवसीय सामन्यांतील 112 डावांतून 52.32 च्या तगड्या सरासरीने त्याने 4919 धावा काढल्या आहेत. त्यात 17 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. रिचर्ड्स यांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला सातव्या एकदिवसीय सामन्यात 81 धावा काढाव्या लागतील. असे झाले तर भारतीय संघ विजयासमीप जाईलच, शिवाय नवा विश्वविक्रमही घडेल.

रिचर्ड्स यांनी 126 सामन्यांतील 114 डावांतून 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांतील हा सर्वाधिक वेगाने धावा काढायचा विक्रम आहे. वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा 118 डावांतून दुस-या, विंडीजचेच गॉर्डन ग्रीनिज 121 डावांतून तिस-या, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स 124 डावांतून चौथ्या आणि भारताच्या सौरव गांगुलीने 126 डावांतून 5000 धावा पूर्ण केल्या असून तो पाचव्या क्रमांकावर आहे.