आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Mingal Of Schin, Sehwag, Drawad Martine Crow

विराट कोहली हा सचिन, सेहवाग, द्रविड या त्रिकूटांचा मिश्रण होय - मार्टिन क्रो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचे स्टार त्रिकूट सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचे अफलातून मिश्रण असल्याचे न्यूझीलंडचा माजी कप्तान मार्टिन क्रो याने म्हटले आहे.
कोहली हा भारतीय संघाच्या फलंदाजीचा प्रमुख कणा आणि मार्गदर्शक ठरत असला तरी त्याला अजून संघाचे नेतृत्व करण्याची कला शिकावी लागणार असल्याचेही क्रो म्हणाले. द्रविडची खेळाबाबतची समर्पित वृत्ती, सेहवागचा बेधडकपणा आणि सचिनच्या फटक्यांचे वैविध्य या सगळ्या बाबी त्याच्या खेळात दिसून येतात. मात्र, त्यामुळे तो चांगला फलंदाज होत असला तरी त्यात त्याचे स्वत:चे कौशल्य आणि स्टाइल विकसित करण्यात आल्यामुळेच त्याचे वेगळेपण सिद्ध होत असल्याचे क्रोने ईएसपीएनसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये नमूद केले आहे.
विराट कोहली हा भविष्यातील भारताचा महान खेळाडू ठरणार आहे. यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्याच्यात आहे. त्याने भारतीय क्रिकेटमधील तीन स्टार खेळाडूंची क्षमता आत्मसात केली आहे. तो आता सचिन आणि द्रविडसारख्या महान खेळाडूंची उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच्या खेळीवरून हे स्पष्ट दिसून येते. भारतीय संघातील नबंर वन फलंदाज म्हणून आता त्याने आपली ओळख निर्माण केली आहे,असेही ते म्हणाले.
तसेच मार्टिन क्रो यांनी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव करताना आगामी कसोटी मालिकेत आपल्या राष्‍ट्रीय टीमलाही सतर्कतेचा इशारा दिला. गुरुवारपासून कसोटीला प्रारंभ होत आहे.
विद्यार्थी ते शिक्षक
कोहली हा नुकताच चांगला विद्यार्थी म्हणून संघात दाखल झाला आणि अल्पावधीत शिकून घेत संघाचा शिक्षक बनण्यापर्यंत त्याने प्रवास केला आहे. केवळ 22 कसोट्यांमध्ये त्याने संघाचा प्रमुख फलंदाज बनत संपूर्ण फलंदाजीची धुरा पेलली आहे. बंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्सच्या पहिल्या सत्रातील प्रशिक्षक म्हणून मी त्याला अधिक जवळून ओळखू लागलो असून त्याची खेळाची समज खूपच चांगली असल्याचे क्रोने सांगितले.