आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli News In Marathi, Indian Cricket Team, Divya Marathi

अखेर विराट कोहली सचिनच्या दाराशी, मार्गदर्शनासाठी मुंबईतच मुक्काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाची चाहूल आतापासूनच लागली आहे. इंग्लंड दौ-यात ऑफ स्टम्प बाहेरचा कच्चा दुवा इंग्लिश गोलंदाजांनी ओळखल्यानंतर आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरकडे धाव घेतली. आजपासून सचिनचे मार्गदर्शन घेण्यासाठी विराट कोहलीने मुंबईतच मुक्काम ठोकला आहे. विराटसोबत युवराजसिंगही बी.के.सी. येथे इनडोअर प्रशिक्षण केंद्रावर दाखल झाला होता. पाठोपाठ प्रवीण आमरेचे मार्गदर्शन घेण्यासाठी रॉबिन उथप्पा, नमन ओझा, दिनेश कार्तिक हेदेखील दाखल झाले आहेत. अजिंक्य रहाणे मुंबई रणजी संघासोबत या आधीपासूनच प्रवीण आमरे यांच्याकडून आगामी मालिकेसाठी काही ‘टिप्स’ घेत आहे.

विराट कोहलीच्या विनंतीवरून सचिन तेंडुलकर आज सकाळपासूनच बीकेसी येथील एनसीए इनडोअर प्रशिक्षण केंद्रावर हजर होता. बीसीसीआयच्या सराव नेट्सचे मुंबईतील प्रमुख लालचंद राजपूत यांनी विराटला सरावासाठी मुंबईच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघांतील तरुण तडफदार वेगवान गोलंदाज दिले. लालचंद राजपूत यांनी मिडल व ऑफ स्टम्पवर ‘गुड लेंग्थ’ स्पॉटवर खडूने दोन रेषा आखल्या आणि गोलंदाजांना त्याच रेषांवर गोलंदाजी करण्यास सांगितले.

विराटला नागेंद्रने चकवले
सचिन तेंडुलकरने विराटला काही खास गोष्टी सांगितल्या, आणि तो पंचांच्या जागेवर उभा राहून विराटची फलंदाजी पाहात होता. मुंबईचा तरुण डावखुरा वेगवान गोलंदाज नागेंद्र चौहान याने विराटला जवळजवळ प्रत्येक चेंडूवर चकवले. इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या खेळपट्टी क्रमांक तीनची ती किमया होती. या कृत्रिम खेळपट्टीवर चेंडू अतिशय वेगात येतो व अधिक स्विंगही होतो. त्यामुळे मुंबईच्या युवा संघांतील गोलंदाजही विराट कोहलीला सतत चकवत होते. ऑफ स्टम्पबाहेर तो इंग्लंडप्रमाणेच झेल देत होता.

रहाणेने मुंबई रणजी संघासोबत सराव करताना प्रवीण आमरे यांच्याकडून ‘टिप्स’ घेतल्या. आमरे म्हणाले, ‘िवंडीजविरुद्ध मालिका भारतातील संथ आणि फिरक्या खेळपट्टीवर होणार आहेत. त्यामुळे अजिंक्यकडून स्वीपच्या फटक्याचा अधिक सराव आज करून घेतला. मात्र त्याबरोबरच ऑस्ट्रेलिया दौ-याच्या दृष्टीनेही आखूड टप्प्याचे चेंडू टाकून सराव करून घेतला.’

पुढे वाचा सचिनकडून विराटचे बाैद्धिक....