आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारी : विराटची 9 स्थानांनी प्रगती, कारकीर्दीतील सर्वोच्च 11 व्या क्रमांकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटीत शानदार कामगिरीच्या बळावर भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत 9 स्थानांनी झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीत कोहली आता 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
विराटच्या नावे 748 रेटिंग गुण आहेत. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसर्‍या डावात 153 धावा काढणार्‍या चेतेश्वर पुजाराने सातवे स्थान कायम ठेवले आहे. दुसरीकडे निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रमवारीत घसरण झाली असून दोन स्थानांच्या घसरणीसह तो आता 23 व्या क्रमांकावर आला आहे. धोनीने पहिल्या डावात 19, तर दुसर्‍या डावात 29 धावा काढल्या. या सामन्यात फ्लॉप ठरलेला शिखर धवन 17 स्थानांच्या घसरणीसह 91 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शिखरचा जोडीदार सलामीवीर मुरली विजय 44 व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या क्रमवारीत आठ स्थानांची प्रगती झाली असून तो आता 46 व्या स्थानी आहे.
डिव्हिलर्स नंबर वन
दक्षिण आफ्रिकेचा एल्बी डिव्हिलर्स पहिल्या, तर हाशिम आमला दुसर्‍या क्रमांकावर कायम आहेत. जॅक कॅलिस दोन स्थानांनी घसरून 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादरम्यान वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत शानदार कामगिरी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर दोन स्थानांच्या प्रगतीसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.