आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Out Of Top 10 Test Batsmen Ranking News In Marathi

इंग्‍लडमध्‍ये बिघडला विराट कोहलीचा खेळ, टॉप-10 मधून 'OUT'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा स्‍टार क्रिकेटपटू विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीच्या टॉप-10 मधून बाहेर पडला. त्‍याचा सहकारी चेतेश्‍वर पुजाराच्‍या स्‍थानाचीही घसरण झाली आहे.

इंग्‍लडमधील कसोटीच्या दोन्ही डावांतील अपयश त्याला भोवले. चेतेश्वर पुजाराचीही क्रमवारीत घसरण झाली आहे.

आयसीसीच्या क्रमवारीत कोहली 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुजारा एका स्थानाच्या घसरणीसह आठव्या क्रमांकावर आला आहे. मुरली विजयने 30 व्या स्थानावर धडक मारली. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनी 27 व्‍या स्‍थानी कायम आहे.

गोलंदाजीत चमकला भुवनेश्‍वर
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार 27 स्‍थानांनी झेप घेत 46 वे स्‍थान मिळविले आहे.

(फोटोओळ - लॉर्ड्सवर सराव करताना विराट)

पुढील स्‍लाइडवर वाचा, पहिल्‍या कसोटीमध्‍ये कसे राहिले भारतीय खेळाडूचे प्रदर्शन ..