आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Questioned By Bcci Over Media Interview

कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केल्याने विराट कोहलीला मागावी लागली माफी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांची शहरातील मैदानावर विजयाचा हिरो बनलेल्या विराट कोहलीला माध्यमांशी बोलणे भलतेच महागात पडले. या चुकीमुळे वराट कोहलीने बीसीसीआयची माफीही मागावी लागली आहे.
बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कोणताही खेळाडू एखाद्या मालिकेदरम्यान माध्यमांशी पत्रकार परिषद वगळता बोलू शकत नाही.
रांचीत झालेल्या तिस-या सामन्यात नाबाद 77 धावांची खेळी करीत मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या विराटने भारताला इंग्लंडवर 7 विकेटनी मात केली होती. त्यानंतर इंग्लिश वृत्तमानपत्र 'द टेलीग्राफ' ला खास (एक्सक्लूसिव) मुलाखत दिली. ज्यात त्याने आपल्या कर्णधारपदावर मत व्यक्त केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिका-यांनी टीमच्या सपोर्ट स्टाफला ई-मेलद्वारे यावर स्पष्टीकरण मागितले आहे. बीसीसीआयने सवाल केला आहे की, आखेर कोहली मीडियाशी बोललाच कसा? स्टाफ ने उत्तर दिले आहे की, अशी चूक पुन्हा घडणार नाही.
कोहलीने याबाबतचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, मला नियमाचे पूर्णतः माहिती नाही. तसेच आपल्याला माफ करण्यात यावे. अशी चूक आपण परत करणार नाही, असे कोहलीने बीसीसीआयला नंतर कळवले आहे.
पुढे क्लिक करा, अखेर असे काय म्हणाला विराट कोहली आपल्या मुलाखतीत...