आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजांची धुलाई करणा-या विराटचे असे आहे खासगी आयुष्‍य !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्‍ली असो किंवा ऑस्‍ट्रेलिया, घर असो किंवा विदेश प्रत्‍येक ठिकाणी धावांचा पाऊस पाडून विराट कोहली अल्‍पावधीतच सुपरहिरो बनला आहे. त्‍याच्‍या सातत्‍यपूर्ण कामगिरीकडे पाहून निवडसमितीने त्‍याला वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि सुरेश रैनासारखे वरिष्‍ठ खेळाडू असतानाही त्‍याला उपकर्णधारपद दिले. 26 वर्षीय विराटने ही कामगिरीही उत्तमरित्‍या पार पाडली.

क्रिकेट विश्‍वात जर एखाद्या यंग आयडॉलचे उदाहरण द्यायचे म्‍हटले तर विराट कोहलीचे नाव सर्वात पुढे येते. मात्र, त्‍याची ऑफ द फिल्‍ड कृत्‍ये त्‍याला परफेक्‍ट आयकॉन बनवू देत नाहीत. याचा अर्थ तो काही हॉटेलमध्‍ये दारू पिऊन नशेत टल्‍ली होऊन भांडणे करीत नाही, किंवा मुलींची छेडछाड करीत नाही. मात्र, त्‍याचा बिनधास्‍त अंदाज त्‍याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्‍या कॅटेगरीमध्‍ये बसवत नाही.

विराट खुल्‍या विचारांचा बिनधास्‍त मुलगा आहे. अश्‍लील टी-शर्ट घालण्‍यातही त्‍याला काहीच वाटत नाही. त्‍याचबरोबर मैदानावर आपले इमोशन्‍स दाखवण्‍यातही तो मागे नाही.
पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या नव्‍या सुपरहिरोचे काही खास फोटो...